केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्हायोलिन वाजवण्याचा घेतला आनंद
चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती च्या निमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तू आणि छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.त्या प्रदर्शनाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व्हायोलिन वाजवायला ज्यावर शिकले ते व्हायोलिन प्रदर्शनात ठेवले होते.याची पाहणी करताना व्हायोलिन वाजवण्याचा मोह ना.रामदास आठवले यांना रोखता आला नाही.त्यांनी व्हायोलिन वाजवण्याचा आनंद घेतला.यावेळी रत्नागिरीहून आलेले साठे उपस्थित होते.त्यांच्या वडिला काकांनी बळवंत साठे यांनी मुंबईत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व्हायोलिन वाजवायला शिकविले होते.त्या आठवणी जागवित ना.रामदास आठवले यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय दिलीप आंबेडकर; बॉर्डरलेस डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे बौद्ध नेते राजेंद्र जाधव; चित्रकार नितीन खरात ; शिल्पकार सुनील देवरे; निवृत शासकीय अधिकारी सु बच्चन राम; निवृत धर्मदाय आयुक्त राजीव देशमुख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या