चित्रा न्युज प्रतिनिधी
दत्तवाड : श्रीमती आक्काताई नेजे हायस्कुल ता शिरोळ येथील सन 1991 - 92 या वर्षाच्या दहावी बॅचच्या माजी विध्यार्थी विद्यार्थीनी चा स्नेह मेळावा डी ए जुगळे सर ,अर बी सूर्यवंशी सर, ए बी नेजे सर, कलाशिक्षक एम सी पुजारी सर, बर्गाले मॅडम, ए बी पाटील सर आदी गुरु जनांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न झाला .
सुरवातीस सर्व गुरुजन व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पवर्ष्टी करून हलगीच्या वाद्यात शाळेच्या गेट पासून विचारपिठा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली . त्यांनतर माजी विद्यार्थीनींनी गुरुजनांने पादय पुजन केले . पहलगाम हल्यात मुत्यमुखी पडलेल्या नागरीकांना व शाळेतील मृत्यु पावलेले शिक्षक , माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपाला परिचय व मनोगत व्यक्त केले . यावेळी जुगळे सर व पुजारी सर यांनी सर्व माजी विद्यार्थीना मागदर्शन केले . तर सचिन मटपती , सुजाता अंबुपे यांनी विशेष मनोगत व्यक्त केले .
स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रात केले होते . सकाळ चा नाष्ता दुपारी स्नेह भोजन व सांयकाळी चहा बिस्किट यांचे छान आयोजन केले होते . दुपारच्या सत्रात मनधना मॅडम यांचा उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रमांने सर्व विद्यार्थ्यांना बाल वयात घेवून गेल्या . सर्व माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊन भरभरून आनंद घेतला .
स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर कलगी .
बसगोंडा पाटील , देवेंद्र चौगुले, शंकर कुंभार , राजू पाटील , युनुस कुरणे सचिन सिदनाळे . सुदर्शन पाटील, पुष्पा मगदूम , मेघना उपाध्ये , बाहुबली कमते, बाहुबली नेजे , श्रीकांत माने यांनी विशेष परिश्रम घेतले .
स्वागत महेश पाटील यांनी तर प्रास्ताविक बसगोडा पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रशेखर कलगी यांनी केले व आभार राजमती सवळे यांनी मानले
0 टिप्पण्या