चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :-पुनश्च अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने शिवमंदिर संस्थान,साईनगर गडचिरोली येथे मंदिर स्वच्छता आणि महाजलाभिषेक महापूजेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मा. खा.तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या पावन प्रसंगी महापुजा जलाभिषेक,आरती,या माध्यमातून नागरिकांमध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्य नांदो, अशी सामूहिक मनोकामना करण्यात आली. धार्मिक आणि सामाजिक सहभागातून हा उपक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडला.
या महापूजेला प्रामुख्याने
मा.खा. डॉ. अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष
प्रशांतजी वाघरे,आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,भाजपा शहराध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,सामाजिक नेते अल्केशभाऊ शनिवारे,विनोद देवोजवार,अविनाश विश्रोजवार, नरेश हजारे, प्रशांत भुगुवार, हर्षल गेडाम, मायाताई मडावी,
यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, श्रद्धावान नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांनी या धार्मिक सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे सार्वजनिक धार्मिक स्थळांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, सामाजिक एकतेचाही सुंदर संदेश या निमित्ताने दिला गेला. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरले.


0 टिप्पण्या