Ticker

6/recent/ticker-posts

आयटक - शालेय पोषण आहार कर्मचारी संघटने तर्फे पंचायत समिती कार्यालय निदर्शने करून निवेदन सादर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथे नुकतेच आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटने ( कामगार संघटना ) च्या आवाहना नुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ठीक - ठिकाणी मोर्चा - धरणा - निदर्शने आंदोलन करण्यात आले 
कॉम्रेड विनोद झोडगे पाटील राज्य महासचिव शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना आयटक यांच्या मार्गदर्शनात व कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वात 
आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना भद्रावती तालुका  तर्फे पंचायत समिती कार्यालय भद्रावती येथे आशुतोष सपकाळ संवर्ग विकास अधिकारी ( बी डी ओ ) यांचे प्रतिनिधी घनशाम 
कुटेमाटे यांना शिस्टमंडळ भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले 
आयटक सह देशातील कामगार कर्मचारी संघटनानी देशपातळीवर आंदोलन पुकारले आहे केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी धोरण राबवित आहे कामगार विरोधी 4 श्रमसहित रद्द करा शालेय पोषण आहार कर्मचारी सर्व योजना कर्म चाऱ्यांना किमान वेतन पेन्शन सामाजिक सुरक्षा शालेय पोषण आहार कर्मचार्यांचे माहे मार्च एप्रिल पासूनचे थकित इंधन बिल व मानधन त्वरित देण्यात यावे व इतर मागण्या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी मार्फत प्रधानमंत्री - राज्यपाल - मुख्यमंत्री - सचिवालय यांना देण्यात आले. 
या शिस्टमंडळात कॉम्रेड आशा सोपनकर - कॉम्रेड स्नेहलता देवगडे -  कॉम्रेड नानेबाई बोबडे - कॉम्रेड मीना शस्रबुद्धे व इतर पदाधिकारी सदस्य हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या