चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय" तिसरी राज्यस्तरी केळी परिषद " मंगळवार दिनांक २७/०५/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जगदाळे मंगल कार्यालय, वैराग रोड, माढा, ता. माढा, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किरणभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली,
सदर केल्ळी परिषदेत महाराष्ट्रातील केळी शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. केळी पिकाची शेती करणारे शेतकऱ्यांची स्थिती बरीचशी नाजूक झाली असून केळी पिकाच्या समस्या वाढत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी केळी पिकाच्या शेतीतील विचारवंत आणि केळी पिकाशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येवून या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली असून केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश, हमीभाव, पिकविमा, केळी या पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश या व इतर अनेक गरजेची पुर्तता करण्यासाटीच केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने राज्यस्तरीयत तिसऱ्या केळी परिषदेचे आयोजन केलेले आहे. सदर केळी परिषदेत प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. किरणभाऊ चव्हाण संस्थापक अध्यक्ष केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच उद्घाटक म्हणून मा. खासदार धैर्यशीलभैय्या मोहीते पाटील, मा. आमदार अभिजीत आबा पाटील व मा. आमदार नारायण आबा पाटील, मा. दादासाहेब साटे, मा. जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले हे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतुलनाना माने पाटील उपस्थित राहणार आहेत.
तसेच मा. श्री. योगेश महसे यांचे केळी उत्पादन खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच मा. श्री. मनोहर पाटील नमो बायो प्लॅन्ट महाराष्ट्र हेड यांचे खत व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच मा. डॉ. विद्या मनोहर सोनवणे यांचे केळी व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
तरी सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी वरील केळी परिषदेस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किरणभाऊ चव्हाण यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी श्री. अतुलनाना माने पाटील, डॉ. हनुमंत चिकणे, श्री. किशोर चौधरी, श्री. छगन गुजर, श्री. उत्तम पाटील, श्री. राजेश नवाल, श्री. पंढरीनाथ इंगळे, श्री. सचिन कोरडे, श्री. महेंद्र पाटील, श्री. वैभव पोळ, श्री. पुरुषोत्तम सजें, श्री. धिरज पाटील, श्री. ओंकार पवार, श्री. केशव गायकवाड, श्री. रत्नाकर पाटील इ. उपस्थित होते. आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये वरील प्रेस नोट प्रसिध्द करण्यात यावी ही विनंती.
आपला विश्वासू,
श्री किरण भाऊ चव्हाण संस्थापक अध्यक्ष केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य
0 टिप्पण्या