Ticker

6/recent/ticker-posts

भूमाफियांविरोधात आदिवासी संघटनांची एकजूट!

चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटना १६ मे ला शहादा येथे काळे झेंडे दाखवणार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :- दिनांक १६ मे २०२५ रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन आहे.या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी,अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी,अक्कलकुवा विधानसभा संपर्क प्रमुख विजय पराडके,शिवसेना सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले,शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैया रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके आदि शिंदे गटाचे पदाधिकारी येणार आहेत.यापैकी चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शणार असल्याबाबतचे  पत्र आदिवासी संघटनांनी शहाद्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना दिले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे ,सुनिल पवार, सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत, वसा वळवी,गुलाबसिंग पाडवी  इत्यादी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
             भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीर, अवैद्य, बोगस ,फेरफार करून हडप केल्या आहेत. नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींचे नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आदिवासींच्या आरक्षणाची बाजू मांडली म्हणून पद्माकर वळवी यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाहीत, अशी धडगांव येथील शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेत धमकी दिली होती.नंदूरबार जिल्ह्य़ातील अक्कलकुवा, शहादा,नवापूर व नंदूरबार हे ४ मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असतांना यापैकी शहादा व नंदुरबार हे २ विधानसभाक्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची चंद्रकांत रघुवंशी मागणी करत आहेत, तसे बोलून दाखवत आहेत.चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासी विरोधी भूमिका घेत असल्यामुळे आदिवासी समाजातील लोकांत त्यांच्याविरोधात तीव्र संताप आहे.म्हणून आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवणार आहेत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
                          आमच्या आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व जन आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाचे धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगांवचे सरपंच राज्या बाज्या पटले व ग्रामपंचायत जुगनी येथील सरपंच राज्या थाव-या पवार हे गुंडांमार्फत व स्वतः वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी व काठ्यांनी मारहाण मारहाण करून तक्रारदारांस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी हे त्यांच्या पक्षाच्या सरपंचांमार्फत आंदोलन कर्त्यांना मारझोड करायला लावून आदिवासी बांधवांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचून गुंडशाहीने आदिवासींचा आवाज दडपण्याचे काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी यांनी दिली आहे.
             आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींच्या नावे होत नाहीत. असा कायदा असतांना चंद्रकांत रघुवंशी व इतर भूमाफियांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी कशा पद्धतीने नावावर करुन घेतल्या,ही मोठी शंका आहे.आदिवासींच्या जमीन परत मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या