Ticker

6/recent/ticker-posts

पाकिस्तानचा आहेस का? म्हणून तरुणाला मारहाण! तरुणाने केली आत्महत्या

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर : काही दिवसांपूर्वी लातूर शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. अमीर पठाण या तरुणाला " तू पाकिस्तानचा आहे का?" अशी विचारणा करत काही तरुणांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ बनवून वायरल करण्याची धमकी सुद्धा दिली होती. या छळाला घाबरून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे लातूर येथे आले असता पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

यावेळी अमोल लांडगे युवा निरीक्षक, जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनीकर, मुस्तफा शेख, अँड. रोहित सोमवंशी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या