Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी संघटना ह्या "तीनपाट";चंद्रकांत रघुवंशीविरोधात ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची आदिवासी संघटनांची मागणी

पोलीस निरीक्षक शहादा यांना संघटना पदाधिकाऱ्यांची लेखी  फिर्याद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :-  आम्ही समस्त आदिवासी संघटनांनी आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी याने शहादा येथील कार्यक्रमात जाहीर रित्या आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी आदिवासींचा जाहीर रित्या अपमान केला आहे.सदर शब्द प्रयोगाचा विडीओ हा सोशल मिडीयावरती वायरल झालेला आहे.आज दिनांक १६ मे २०२५ रोजी आम्ही आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला म्हणून आम्हाला आम्ही आदिवासी आहोत हे माहित असतांना देखील जाणीवपूर्वक जाहीर ठिकाणी आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक अपमानास्पद शब्द प्रयोग केलेला आहे.म्हणून आम्ही आदिवासी संघटना आज रोजी समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहून  लेखी फिर्याद देत होतो.मात्र सदर इसमाविरूद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला नाही.सदरील लेखी फिर्याद पोलीस निरीक्षक शहादा यांच्या सांगण्यावरून सदरील लेखी फिर्याद सामाजिक रित्या देत आहोत.म्हणून फिर्यादीची गंभीर दखल घेऊन सदर इसमाविरूद्ध ॲस्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा.म्हणून लेखी फिर्याद देत आहोत. अशा स्वरूपाची लेखी फिर्याद रवींद्र वळवी कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना,सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, गोपाल भंडारी राज्याध्यक्ष बिरसा फायटर्स, रोहीदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभीमान संघ, पंकज वळवी जिल्हाअध्यक्ष भारतीय स्वाभीमान संघ, अजय वळवी तालुकाध्यक्ष नंदूरबार भारतीय स्वाभीमान संघ, योगेश गावीत सामाजिक कार्यकर्ता इत्यादी आदिवासी संघटना कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना लेखी फिर्याद दिली आहे.
             दरम्यान चंद्रकांत रघुवंशी यांच्याविरोधात तक्रार नोंदवून घेत नाहीत, म्हणून पोलीस ठाण्यातच आदिवासी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.ॲस्ट्रासिटीसारखे गंभीर गुन्हे शहादा पोलीस ठाण्यात नोंदवले जात नाहीत, त्यासाठी आदिवासी तक्रारदार यांना नेहमीच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनाच भेटावे लागते.पोलीस निरीक्षक हे पुढा-यांच्या इशाऱ्यावर काम करतात.आमच्या सारख्या संघटना पदाधिकाऱ्यांची तक्रार नोंदवली जात नसेल तर सर्वसामान्य आदिवासी बांधवांची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात नोंदवली जात नाही,असे सिद्ध होते.शहादा पोलीस ठाणे हे फक्त विशिष्ट लोकांसाठीच आहे.प्रत्येक वेळेस जर आम्हाला पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना तक्रार नोंदवण्यासाठी भेटायला जावे लागत असेल तर शहादा पोलीस ठाणे बंद करा,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या