Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणाने आयुष्याची सुंदरता वाढवा - मौलाना नियाज अहमद.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज :-अकलूज येथील ताहेरा फाउंडेशने आयोजीत एस.एस.सी.मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारावेळी अकलूजच्या बज्मे अन्वारे सुफिया मदरशाचे प्रिन्सिपल मौलाना नियाज अहमद यांनी गुणवंताना मार्गदर्शन करताना सांगितले.
         सालाबाद प्रमाणे ताहेरा फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाई पार्क येथे गुणवंताचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला.अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता कन्या प्रशालेतील सिफा सिकंदर तांबोळी हिच्या अथक परिश्रम,शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, कुटुंबाचे पाठबळावर सिफा ने मिळवलेल्या 97% गुणाबद्दल हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी विद्यार्थी-पालकांचे विशेष अभिनंदन केले.
        मौलाना नियाज अहमद पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी असेच पुढे शिकून आपले व कुटुंबाचे नाव मोठे करावे. आपल्यातील माणूसपण जपत शिक्षणाचे महत्व समजून घ्यावे. उच्च शिक्षित होवून भारत देशाची सेवा करावी असे अवाहन त्यांनी केले.यावेळी सैफुला जुबेर तांबोळी,ओवेज अ.रहेमान तांबोळी,आसिम समीरहसन तांबोळी,जैद हाजी जावेद तांबोळी,शाहनिज सादिक बागवान या गुणवंत विद्यार्थ्यांना ताहेरा फाउंडेशन  कडून शालेय साहित्य ठेवण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सॅक देवून सत्कार करण्यात आला. 
                    या कार्यक्रमासाठी खजिनदार हाजी अस्लमभाई तांबोळी,कार्याध्यक्ष आयुबभाई तांबोळी,सचिव मुन्नाभाई तांबोळी,समीरहसन तांबोळी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान यांनी केले तर आभार शकिल मुलाणी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या