Ticker

अमरावतीतील दीपक सरदार पळाला ; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन!

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेला ॲड. दीपक सरदार याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत तीव्र आंदोलन केले.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून दीपक सरदार यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. त्याचा शोध घेऊन त्याच्या घरी भेट दिली असता तो समोर न येता घर बंद करून पळून गेला. त्याच्या वादग्रस्त पोस्टबाबत सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार, महासचिव साहेबराव वाकपांजर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर, सागर भोवते, सिद्धार्थ भोजने, विजय चोरपगार (भारतीय बौद्ध महासभा), संतोष बगाडे, आदेश मेटांगे, प्रशांत गजभिये, अशोकराव दूधंडे, मनोज जामनिक, विनय बांबोले, शैलेश बागडे, सचिन जोगे, अमोल जवंजाळ, बबलू मुंद्रे, दादाराव गडलिंग, सुमित खंडारे, रमेश आठवले यांसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यापुढे कोणीही सुजात आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात बेजबाबदार वक्तव्य केल्यास कायदेशीर कारवाई आणि योग्य तो सत्कार केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या