दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती : माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दि. 8 जून पासून मोझरी, ता. तिवसा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात केले आहे.
आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या पथकाला आंदोलक बच्चू कडू आणि इतरांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले असून, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका तज्ज्ञ डॉक्टरांचाही यात समा
वेश आहे. हे पथक दिवसातून दोन वेळा आंदोलकांच्या आरोग्याची तपासणी करेल आणि आवश्यक उपाययोजना करून त्याचा अहवाल दररोज दोन वेळा सादर करेल.
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यापूर्वी 24 मे रोजी आणि 4 जून रोजी निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
0 टिप्पण्या