चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात नाशिक येथील विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून जिल्ह्याच्या समन्वयक व राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य दिशा पिंकी शेख तसेच युवा आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीला युवक जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, युवा महानगर अध्यक्ष रवी पगारे आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी दिशा पिंकी शेख यांचे स्वागत केले.
बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष, महासचिव, युवा आघाडीच्या पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी वामनदादा गायकवाड, संजय साबळे, रमेश गवळी, विक्रम जगताप संविधान गांगुर्डे, दीपक पगारे, विकी वाकले, संदीप भरीत, संतोष वाघ, विनय कटारे, दिलीप लिंगायत, ताराचंद मोतमल, भीमराव गांगुर्डे, सुनील साळवे, दिनेश साळवे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचलन विश्वनाथ भालेराव यांनी केले.
0 टिप्पण्या