चित्रा न्युज प्रतिनिधी
मालेगाव : वंचित बहुजन आघाडीची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
युवा आघाडी राज्य सदस्य चेतन गांगुर्डे, नाशिक पूर्व जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या उपस्थितीत नाशिकपूर्व जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यासंदर्भात बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. पक्षाच्या नेतृत्वाने स्थानिक पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी समविचारी पक्षांनासोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी जिल्हा कमिटीला अधिकार देण्यात असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार चाचपणीच्या कामाला लागावे असे जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख यांनी आवाहन केले.
बैठकीस मालेगांव, नांदगाव, बागलाण व कळवण तालुक्यातील जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या