Ticker

6/recent/ticker-posts

राॅयल्टी न भरणा-या व अनाधिकृत वीट भट्टीवर कायदेशीर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा - शहादा  तालुक्यातील वीट भट्टी मालक राॅयल्टी भरतात किंवा नाही याची चौकशी करून राॅयल्टी न भरणा-या वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा व अनाधिकृत वीट भट्टी मालकांवरही कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार, रामदास मुसळदे व भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे ,दगडू निकुंभ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
                     आपल्या तालुक्यात घरकुल योजनेंतर्गत व स्वतःच्या खाजगी खर्चातून अनेक  लोक घर बांधकाम करीत आहेत. घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे.वीटांची वाढती मागणी बघून तालुक्यातील सर्वच वीटभट्टीधारक,वीटमालक हे त्यांच्या मनमामी पद्धतीने वीटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांस घरबांधकाम करण्यास परवडत नाही. या एप्रिल २०२५ च्या चालू महिन्यात वीटांचे दर ३००० वीटां साठी १२५०० रूपये होता.त्यानंतर लगेचच १४००० रूपये  करण्यात आला व नंतर पुन्हा  १६००० रूपये करण्यात आला.आजचा दर १८००० रूपये घेतले जात आहेत.अचानक पणे वीट मालकांनी वीटांचे दर वाढवून ग्राहकांस लुबाडणूक सुरू केलेली आहे.वीटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवाणा-या वीटभट्टीधारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी.जेणेकरून वीटभट्टीधारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल. 
                  हे वीट भट्टी मालक तहसील कार्यालयात राॅयल्टी भरतात किंवा नाही, याचीही सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.कारण अनेक वीट भट्टी मालक यांनी शासनाचा महसूल बुडविला आहे.अशा राॅयल्टी न करणा-या वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी.तसेच तालुक्यातील अनाधिकृत चालू असलेल्या वीटभट्टीमालकांवर सुद्धा कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांचेकडे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या