——————————————
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-गोहत्या बंदी कायद्याची कायदेशीर व कडक अंमलबजावणी करा,असे स्पष्ट आदेश पालकमंञी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी परवाच लातुरच्या जिल्हा प्रशासनाला दिले.अशी न्यूज मिडीयातून वाचणात आली.तरीही संबंधित प्रशासन या आदेशाची अंमलबजावणी करीत नाही.असेच म्हणावे लागेल.कारण आजही हाळी हंडरगुळी {ता.उदगीर} येथील सा. बांधकाम खात्याच्या मालकीच्या जागेवर/नालीवर अतिक्रमण करुन विनापरमीट अवैध माॅंस विक्री ती ही उघड्यावर होत असल्याचे सामान्य जनतेला दिसते.परंतू,संबंधित खाते व अधिकारी यांना दिसत नाही.याचे नवल वाटते.म्हणुनच पालकमंञ्याचे आदेश व प्रशासन कोमात गेल्यानेच हाळीहंडरगुळीत जि.प.शाळेजवळच उघड्यावर अवैध माॅंस विक्री आणि बीफ खानावळी सुरु आहेत.व कांही घरा मध्ये अवैध कत्तलखाने चालत असल्याचे 2 कसायाने नाव ओपन करायचे नाही.या अटीवर सांगितले! हाळीहंडरगुळीतील अवैध माॅंस विक्रेते व कत्तलखाने चालक मंडळी हे प्रशासनाच्या मदतीने पालकमंञी असलेल्या "राजें" चा आदेश सर्रास पायदळी तुडवीत असल्याचे दिसते. म्हणुन आता पालकमंञी असलेले "राजे" काय निर्णय घेतात.
याकडे हाळीहंडरगुळीकरांचे लक्ष लागले. या संदर्भात दि.1 रोजी जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत बोलताना पालकमंञी असलेल्या "राजेंनी" गो हत्या बंदी कायद्याची कडी अंमलबजावणी करा,गुरांची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्पेशल पथके निर्माण करावीत,जप्त केलेल्या गुरांचे पालन पोषण गोशाळेद्वारे करण्याची कडक कार्यवाही करावी आणि अवैध कत्तलखाने तसेच उघड्यावरील माॅंस विक्री रोखण्यासाठी जि.प्रशासनाने महाराष्ट्र प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण {सुधारीत} कायदा 1995 यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कठोरात कठोर पावले उचलावीत, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.तरीही या आदेशाची सर्रास पायमल्ली अवैधरित्या उघड्यावर माॅंस विक्री करणारे व त्यांना मदत करणारे अधिकारी करीत असल्याचे चिञ हाळीहंडरगुळीत दिसत आहे. तसेच संबंधित यंञणा शरमिंदी असल्यानेच कसलीच कारवाही करु शकत नाही!अशी कुजबूज सुरु आहे तेंव्हा आता पालकमंञी महोदयांनीच स्पाॅट पाहणी करुन कार्यवाहीचे "शस्ञ" हाती घ्यावे,अशी माफक अपेक्षा सामान्य जनतेची आहे..

उघड्यावर माॅंस विक्री करु नये तसेच कायद्याचा प्रश्न निर्माण होऊ नये,याची खबरदारी घेण्याची ताकीद सर्व माॅंस विक्रेत्यांना दिलो आहे सपोनी.बी. एस. गायकवाड,वाढवणा पो.स्टे.ता.उदगीर
—————————————————
उघड्यावर व विनापरमीट तसेच सा.बां. खात्याच्या जागेवर माॅंस विक्री होत आहे असा ठराव घेतला असून तो ठराव कार्यवाहीसाठी वरीष्ठांकडे दिला जाईल एस.आर.कांबळे,ग्रा.वि.अ. हंडरगुळी.
0 टिप्पण्या