चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : शहरात 65 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील तहसील कार्यालय तथा पंचायत समिती कार्यालयात ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी नायब तहसीलदार मनोज आकनूर वार, नायब तहसीलदार सुधीर खांडरे,ठाणेदार लता वाडिवे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर एपीआय केदारे साहेब,कर्मचारी तथा शहरातील पत्रकार बंधूनागरिक उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी अशुतोष सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे ए बी डी ओ बंडू आकनुरवार, गटशिक्षणाधिकारी महाकाळकर सर, कृषी अधिकारी,अधिकारी कर्मचारी तथा शहरातील नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यावेळी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या