Ticker

6/recent/ticker-posts

यशवंत व अर्चना या दोन्ही प्रेमीयुगलांना अडकविले विवाह बंधनात

शिवसेनेचे शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते सुरज शहा व सुमित हस्तक यांच्या पुढाकाराने प्रेमी युगलाचा विवाह संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती : आजच्या सामाजिक परिवर्तनाच्या युगातही जाती-पातीचे बंधन प्रेमाच्या नात्याला अडथळा निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरज शहा यांच्या मार्गदर्शनात व श्री. सुमित हस्तक यांच्या पुढाकाराने  यशवंत दत्तुजी सोनेकर व अर्चना बापुराव आत्राम रा. उमरीपोड ता. झरी जिल्हा यवतमाळ या दोन प्रेमीयुगलाना  विवाह बंधनात अडकून एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य पार पाडले.

एका प्रेमी युगलाचा त्यांच्या वेगवेगळ्या जातींमुळे कुटुंबीयांकडून विवाहास विरोध होत होता. मात्र प्रेमाच्या या नात्यावर विश्वास ठेवत आणि सामाजिक विषमते विरुद्ध उभं राहत, सुमित हस्तक यांच्या वतीने मुलगा यशवंत दत्तुजी सोनेकर (बौद्ध) व मुलगी अर्चना बापुराव आत्राम (आदिवासी )रा. उमरीपोड ता. झरी जिल्हा यवतमाळ  या दोन प्रेमी युगलाचा विवाह आयोजित करून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला.

हा विवाह केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणणारा प्रसंग नव्हता, तर जातीभेदाच्या रूढ सामाजिक चौकटींना छेद देणारा एक क्रांतिकारी टप्पा ठरला आहे. या धाडसी निर्णयाने नव्या पिढीसमोर प्रेम, समता आणि सामाजिक एकोपा याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.

सुमित हस्तक यांच्या या कार्यामुळे समाजात एक नवीन विचारधारा पेरली जात आहे — जी जातीपातीत न अडकता माणूसपणाला प्राधान्य देते. या समाज परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या