Ticker

6/recent/ticker-posts

लाडकी बहीणसाठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा ३३५ कोटी ७० लाख रूपये निधी वळवला;बिरसा फायटर्सचा निवेदनाद्वारे विरोध !


चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :- लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा ३३५ कोटी ७० लाख रूपये वळवलेला निधी आदिवासी विकास  विभागास परत करावा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,बिलीचापडा अध्यक्ष वनसिंग पटले,भारतीय स्वाभीमान संघाचे रोहीदास वळवी,पंकज वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेच्या जोरावर महायुती सरकारच्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली असून महायुती सरकार सत्तेवर आले आहे.ही योजना राबविण्यासाठी सरकारला डोकेदुखी निर्माण झाल्यानंतर यापूर्वीही सरकारने विकासापासून वंचित घटकातील आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागातील एकूण ७ हजार कोटी रूपये लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला आहे.त्यानंतर पुन्हा मे २०२५ महिन्यात आदिवासी विकास विभागाचा ३३५ कोटी ७० लाख रूपये निधी वळवला आहे.ही बाब आदिवासी समाजाच्या विकासासाठी अत्यंत धोकादायक व अन्याय कारक आहे. सरकारने सन २०२५-२०२६ या  अर्थसंकल्प अधिवेशनात अनुसूचित जमाती उपाययोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.यापैकी अनुसूचित जमातीसाठी देण्यात आलेल्या सहाय्यक निधी ३ हजार ४२० कोटी अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रूपयांचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवला आहे.यातून सरकारने आदिवासी  बांधवांच्या विकासाला कात्री लावली आहे.आदिवासी बांधव अजूनही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. विकासापासून कोसो दूर आहेत. आदिवासींचा व मागासवर्गीय समाजाचा विकास करायचा असेल तर त्यांचा निधी हा त्यांच्याच विकासासाठी मिळाला पाहिजे.म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास  विभागाचा यापूर्वीचा ३ हजार कोटी व आताचा ३३५ कोटी ७० लाख रूपये  निधी वळवला आहे,तो आदिवासी विकास विभागास परत करण्यात यावा.हीच नम्र विनंती.अन्यथा सरकारच्या या निर्णयाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या