श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :-वसमत येथे पंचायत परिसरात व पंचायत समितीच्या गेट समोर मोटरसायकल ची अशी भली मोठी रांगच रांग लागते यामुळे प़ंचायत समीतीला कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पंचायत समितीच्या गेट च्या बाजूला रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून मोकळी जागा असून सुद्धा त्या जागेवर मोटरसायकल न लावता ऐन रोडवरच मोटरसायकल उभ्या करत असलेल्या पाहयाला मिळत आहेत, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व वाहतूकीची देखील मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे, त्यामुळे या प्रकाराला शासन प्रशासन विषेश लक्ष देतील का? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे.
0 टिप्पण्या