Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर शहराला पावसाच्या पहिल्या पाण्याने घातला वेळखा...वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू....

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहराला झोडपले....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:- दिवसभराच्या उकाड्यानंतर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात जोरदार विजांच्या कडकडाटासह धुवाधार अवकाळी पाऊस झाला या पावसाने हिमायतनगर शहरातील नदी नाले भरून ओसंडून वाहत होते या पावसामुळे शहराला पावसाच्या पाण्याने विळखा घेतला त्यामुळे दोन तास घरातील मुख्य कमानी जवळ वाहतूक ठप्प झाली असल्याचे दिसून आले तर शहरातील शेतात बकरी चांरण्यासाठी  गेलेल्या शेख अजगर या शेतकऱ्यावर अचानक वीज पडून तो जागीच दगावला असल्याची घटना घडली....

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 17 मे च्या दुपारी जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहेत यात हिमायतनगर शहरातील उमर चौक परिवारातील  खुबा मस्जिद भागातील शेख अजगर या शेतकऱ्यावर दुपारी अचानक वीज पडून त्यांचा जागेस मृत्यू झाला अवकाळी पाऊसाच्या तडाख्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी पिके व फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन अनेक गोरगरीब कष्टकरी मजुरांच्या घरांचे  नुकसान झाले मान्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच हिमायतनगर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील व शहरातील असंख्य नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे दिवसभरात कमालीचे वातावरण तापल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकावर अचानक आलेल्या या अवकाळी पावसासह वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे शहरातील मुख्य कमानी जवळ पाणी साचल्याने दोन तास वाहतूक टप्पा झाल्याचे दिसून आले त्यामुळे अवकाळी पावसाच्या पहिल्या पाण्यातच हिमायतनगर शहरातील मुख्य कमानी ला पाऊसाच्या पाण्याने वेडा घातल्याचे चित्र दिसून आले त्यासह शहरातील ठिकठिकाणी नाल्या तुबलेल्या  घाण पाणी रस्त्यावर आल्याने  शहरातील नगरपंचायत प्रशासन व तहसील प्रशासनाचे नियोजन मात्र शून्य दिसून आल्याने अनेक नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या