श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :-हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईची बैठक दिनांक 1मे रोजी कळमनुरी येथील तोषणीवाल मंगल कार्यालय बैठक पार पडली या बैठकीत दैनिक गाववाल्याचे संपादक विजय भाऊ दगडू यांची जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष नंदुभाऊ तोषणीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नंदुभाऊ तोषणीवाल यांनी आपल्या जिल्ह्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खोडके यांनी जिल्हा पदासाठी दैनिक गाववाल्याचे संपादक विजय भाऊ दगडू यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला या प्रस्तावाला प्रकाश इंगोले यांनी अनुमोदन दिले त्यानंतर जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते विजय भाऊ दगडू यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित अध्यक्ष व मावळते अध्यक्ष यांचा सत्कार करुन पुढिल कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीला मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खोडके चंद्रकांत देवणे हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले कळमनुरी तालुका अध्यक्ष अलीमोदिन कादरी शफिडोंगरगावकर मुजिब पठाण विठ्ठल कदम राजू जयस्वाल मो.रफिक अनवर नाईक शंकर राऊत इरफान सिद्दिकी सयद सतारखाॅ पठाण वक्कोयदिन सिद्दिकी शेख शाहेद शेख जाहेद माजेद सिद्दिकी इब्राहिम जाहागीरदार राजेंद्र बारबिडे रवि कुंटे श्रीकांत बारहाटे फिरदोस सिद्दिकी सौरभ साकळे इत्यादीची उपस्थिती होती
0 टिप्पण्या