भव्य राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन 18 मे 2025 ला अड्याळ येथे
शाळेतून दहावी व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्यांचा सुद्धा सत्कार होणार
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 18 मे 2025 ला भव्य राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा परीक्षा वर्ग 8 ते वर्ग 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेली 15 मे 2025 पर्यंत नाव नोंदणीची तारीख ठरविण्यात आलेली असून परीक्षा शुल्क 20 रुपये ठेवण्यात आलेली आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न स्वरूपाची 1 तासाची 100 मार्कची असेल. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास परीक्षा दोन टप्प्यात त्याच दिवशी घेण्यात येईल. तसे विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल. प्रथम बक्षीस 1001 रुपये ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ ठेवण्यात आलेले आहे. द्वितीय बक्षीस 701 रुपये सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र , पुष्पगुच्छ ठेवण्यात आलेले आहे. तृतीय बक्षीस 501 रुपये , सन्मानचिन्ह , सन्मान प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून 25 मे 2025 ला निकाल घोषित करण्यात येईल. व 9 जून 2025 ला दुपारी 3 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. त्याचप्रमाणे शाळेतून दहावी मध्ये व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. ऑनलाइन नाव नोंदणी करिता पंकज वानखेडे तसेच प्रत्यक्षात आपला नाव नोंदणी करिता ओ एस एस कॉम्पुटर इन्स्टिट्यूट अड्याळ येथे भेट द्यावी.
तसेच दहावी बारावी मध्ये शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याने पत्रकार संजीव भांबोरे 70 66 37 0489 संपर्क साधावे.
0 टिप्पण्या