Ticker

6/recent/ticker-posts

नगर परिषद भद्रावती मार्फत नागरिका करिता थंड पाणपोई सुविध



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : दिनांक १ मे २०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद भद्रावती मार्फत नगरपरिषद कार्यालय शेजारील सेवादल मैदानात थंड पाण्याची पाणपोईचे उद्घघाटन करण्यात आले.

सदर पानपोई नगर परिषद निधीतून उभारण्यात आलेली असून शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सदर उद्घाटन झालेल्या पानपोई सारख्या अजून तीन पानपोई शहरातील नाग मंदिर परिसरात, भाजी मार्केट परिसरात ,व नवीन बस स्थानक परिसरात लावण्यात येनार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी यांनी दिली. सदर पानपोई च्या उद्घाटनास माजी नगराध्यक्ष मा. श्री.अनिल भाऊ धानोरकर, माजी उपाध्यक्ष श्री. प्रफुल भाऊ चटकी, माजी नगरसेवक श्री प्रशांत डाखरे, माजी नगरसेवक श्री.राजू सारंगधर व माजी नगरसेविका श्रीमती सरिता सूर, तसेच शहरातील नागरिक व समस्त नगर परिषद कर्मचारी वृद उपस्थित होते. सदर पाणपोई उभारण्याकरिता पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री. निलेश रासेकर, श्री दिनेश मासिरकर श्री.दुर्योधन गोऊत्रे व श्री.रवि जिडगीलवार यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या