मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव :- धाराशिव येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळावा मंगळवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद नाट्यगृहा मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये संप्पन झाला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्यात आला वंचित बहुजन आघाडी परंडा तालुका नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी निवड समिती प्रमुख म्हणून धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव यांची ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आदेशित करून जबाबदारी दिली या प्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल,निरीक्षक अविनाश भोसीकर,फुले आंबेडकर विद्वत सभा राज्यसमन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,ॲड.प्रणित डिकले,बि.डि.शिंदे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे,सुधिर वाघमारे,मोहनदादा बनसोडे,उत्तरेश्वर ठवरे,आण्णा काळे,किरण बनसोडे,इर्शाद बागवान,गणेश सरवदे,भाऊसाहेब आंदुरकर,विकास बनसोडे,नासिर शेख, नामदेव वाघमारे उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडी परंडा तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी साहेबांच्या आदेशानुसार रविवार दिनांक-२५में रोजी परंडा येथे निवड समितीच्या वतीने मुलाखती होणार आहेत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
0 टिप्पण्या