Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात केली.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- विकसित कृषि संकल्प अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. दि. २९ मे  ते १२ जून २०२५ दरम्यान भंडारा जिल्ह्यातील ९० गावामध्ये रथयात्रा येऊन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात येणार आहे. हे अभियान  जिल्हाभरात यशस्वीपणे  राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आज दिले
. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरांमधून कृषी संकल्प अभियानाच्या प्रचार प्रसिद्ध रथास जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृषि विभाग, आत्मा, पशु संवर्धन, कृषि विज्ञान केंद्र, मत्स्य विभाग, रेशीम विभाग तसेच इतर संलग्न विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संलग्न विभागांनी जबाबदारीने  एकमेकांशी समन्वय ठेऊन अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निर्देश  जिल्हाधिकारी महोदयांनी याप्रसंगी दिले तसेच अभियान राबवितांना भंडारा जिल्हा अग्रस्थानी राहील यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

90 गावात येणार अभियान

आज मोहदुरा गावातून या अभियानाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 90 गावात या अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर उषा डोंगरवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या