Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक शहरात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नाशिक : वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्हा कमिटीकडून महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २१ मे रोजी पार पडली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत नुकतीच नाशिक समन्वयक म्हणून निवड झालेल्या दिशा पिंकी शेख यांचा अभिनंदनाचा ठराव पारित झाला. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सन्मानाने युती झाल्यास युती किंवा स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. 
यावेळी महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी महानगरातील पदाधिकाऱ्यांकडून अहवाल संकलित केला. बैठकीच्या शेवटी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी काल. जितुभाऊ साळवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, महिला जिल्हा अध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष दामोदर पगारे, नेते संजय साबळे, युवा महानगर महासचिव दिपक पगारे, संदीप काकळीज, विक्रम जगताप, रमेश गवळी, ताराचंद मोतमल, विनय कटारे , दिलीप लिंगायत, मारुती घोडेराव, भीमराव गांगुर्डे, संतोष वाघ, आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या