- बोगस बी-बियाण्याच्या तक्रारी आल्यास कारवाई करा
- पालकमंत्री संजय सावकारे
▪️खरीप हंगामपुर्व नियोजन बैठक संपन्न
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित लागवडीप्रमाणे मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते-निविष्ठा, किटकनाशके यांची उपलब्धता असली पाहिजे. यात काही कमतरता असल्यास त्याचीही पूर्तता करण्याच्या दृष्ट्रीने कृषी विभागाने तयारी ठेवावी.
जिल्हाधिका-यांनी लवकरच कृषी दुकानदारांची बैठक घेऊन बोगस बी-बियाणे विक्रीला चाप लावण्याच्या सूचना दयाव्यात. कृषी विभागाने याबाबत भरारी पथकांवर नियंत्रण ठेवावे.तसेच भरारी पथकातील अधिकारी –कर्मचा-यांनी सजग राहून बोगस बी-बियाणे विक्रेत्यांवर अकुंश लावण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज दिले.
नियोजन भवन येथे आज भंडारा जिल्ह्याच्या खरीप हंगामपुर्व नियोजन-2025 ची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री श्री.सावकारे ऑनलाईन उपस्थित होते.आमदार राजु कारेमोरे,खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, जिल्हाधिकारी संजय कोलते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
खते,बी-बियाणे विक्रीनंतर दुकानदारांनी शेतक-यांना पककी देयके दयावीत,असे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी,असे ही श्री.सावकारे यांनी सांगितले.
----------------
रेशीम व कृषी विभागाने शेतकरी प्रशिक्षणाचे नियोजन करावे तसेच रेशीम शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावे असे निर्देश श्री.सावकारे यांनी दिले.
---------------
तुमसर येथील रेल्वे रॅक पॉईण्टसाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी पाहणी करून जिल्हाधिका-यांनी पुढील दोन महिन्यात या कामाला पुर्ण करावे .राज्य शासनाच्या पाणी वाटप धोरणानुसार पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी आरक्षीत करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी बैठक घ्यावी असे ही सावकारे यांनी सूचीत केले.सर्व शासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा लावण्यात यावी.
---------------
गाळयुकत शिवार योजनेतंर्गत शेतक-यांना गाळ वाहतुक करतांना सुलभता असली पाहीजे,तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामे पावसाळयापुर्वी करावी.
या बैठकीला आमदार श्री.कारेमोरे व खासदार श्री.पडोळे यांनी ही काही बाबी पालकमंत्री श्री.सावकारे यांच्या निदर्शनास आणुन दिल्यात.त्यासंदर्भात योग्य दखल घेऊन् कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.सावकारे यांनी दिलेत.
या कार्यक्रमाचे सादरीकरण जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी संगीता माने व आभार कृषी अधिकारी वृषाली देशमुख् यांनी केलेत.
0 टिप्पण्या