Ticker

6/recent/ticker-posts

भारत युद्धात जिंकला आणि तहात हारला!


पंतप्रधान नरेंद्र मोदी नरोबा - कुंजोबाच्या भूमिकेत आहे - ॲड. प्रकाश आंबेडकर 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : आज सकाळी बातमी आली आहे की, जम्मू काश्मीरमध्ये सरकारकडून भारतीय सैन्याला दहशतवाद्यांना शोधून काढण्यास सांगण्यात आले. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बातम्या येताय की, भारताने पाकिस्तानच्या हवाई दलाचे 20 टक्के नुकसान केले म्हणून पाकिस्तानकडून युद्ध विरामाचा प्रस्ताव आला. या प्रस्तावाला भारत सरकारने स्वीकारले.

परंतु, भारताने प्रस्ताव स्वीकारण्याआधी पाकिस्तानचे बेस विचारले असते, त्याची यादी मागवली असती व त्या प्रस्तावावर आम्ही विचार करू, अशी भूमिका घेतली असती, तर आज भारतीय सैन्याला परत आतंकवाद्यांना शोधण्याची गरज पडली नसती. 

आम्ही पाकिस्तान विरुद्ध युध्दात जिंकलो पण, तहात हरलो. ही लज्जास्पद गोष्टी आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले को, पाकिस्तान हरल्यानंतरही जिंकल्याचा दावा करतोय आणि भारत जिंकल्यावर ही शांत आहे.

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी आलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये धमक नाहीये की, ते त्यांच्या पक्षातील लोकांविरोधात कारवाई करू शकत नाहीत. कोर्टात जाऊन याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. 

जोपर्यंत भारताचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यक्तव्यावर बोलत नाही, तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प जे बोलताय ते खरं आहे, असं म्हणावं लागेल. आपला पंतप्रधान नरोबा कुंजोबा आहे.

नितीश कुमार यांचा निषेध ―

गेल्या अनेक महिन्यापासून बोधगयेमध्ये शांततेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या आंदोलनाविरोधात अग्रेसिव्हपणा दाखवण्यात आला. ज्यातून आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. हे दुर्दैवी आहे. सरकारचा आम्ही निषेध करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या