Ticker

6/recent/ticker-posts

कॅनलच्या कामावरील युवक मजुराचा गडफास घेऊन आत्महत्या



आत्महत्या नसुन घातपात असल्यासल्याची नागरिकांत चर्चा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : कॅनलच्या कामावर असलेल्या युवक मजुराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दुपारी 1 वाजताचे सुमारास उघडकीस आली.शेख समीर शेख जाफर (21)रा. दाईतना ता. जी. परभणी असे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव (धरण ) येथील कॅनल वरील जलवाहिनी टाकण्याच्या कामावर सदर युवक मागील काही दिवसापासून कामावर आहे. याचे सोबत अनेक मजूर कार्यरत असतांना कॅनल कडेला असलेल्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत हा मजूर आढळून आला.
मृतक युवकाची मोटारसायकल कॅनल च्या वाहत्या पाण्यात पडलेली असून स्वतःची टी शर्ट व पॅन्ट च्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे जमिनीवर पाय होते. समीरच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा निदर्शनास आल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथे आणण्यात आले आहे.पुढील तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या