Ticker

6/recent/ticker-posts

करंजी जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा....


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड 

नांदेड :-शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली स्वीकारली पाहिजे. व्यस्त जीवनशैलीमुळे, तुम्ही तुमच्या शरीराला, हृदयाला आणि मनाला वेळ देऊ शकत नाही. हळूहळू आपले शरीर आणि मन दोन्ही ताण तणावग्रस्त होऊ लागतात आणि तुम्हाला थकवा जाणवू लागतो. ह्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शरीर आणि मन दोन्ही नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकानी नित्य योग करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दि 21 जून रोजी करंजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर  यांनी सांगितले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त "एक देश एक योग " ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी मागील 11 वर्षापासून सुरू केली त्या मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळून दि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून  करंजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी  एकत्र येऊन सामूहिक योग साधना केली. या उपक्रमात सहभागी होणं ही एक अत्यंत प्रेरणादायक आणि शांततादायी अनुभूती असल्याचे मत शाळेचे शिक्षिका स्वाती भुरे मॅडम यांनी केले योग ही केवळ शारीरिक व्यायाम पद्धती नाही, तर ती एक आध्यात्मिक साधना आहे, जी आपल्याला मानसिक शांती, आत्मविश्वास आणि संयम शिकवते  त्यानंतर सामूहिक योग कार्यक्रमाद्वारे दररोज सर्वांनीच नियमित योगाभ्यास करण्याचा निर्धार केला, ज्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि एकात्मतेची भावना निर्माण होईल यावेळी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या