प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन; लाभार्थ्यांची २२६०० रूपयांची फसवणूक!
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार:नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी लाभार्थ्यांना दूधाळ जनावरे वाटप करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,आकाश तडवी,योगेश रावताळे,हिरालाल वळवी,प्रकाश गावित, मनिलाल गायकवाड, भास्कर गावित,कालूसिंग कोकणी,दिलीप गावित, अरूण भंडारी,गोपाल भोसले,राजू गावित, फिलीप गावित, प्रकाश रावताळे,राकेश वळवी,शिलवान कोकणी,विक्रम कोकणी
आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय विशेष सहाय्य योजनेंतर्गत आदिवासी विकास बचत गटांना दूधाळ जनावरे वाटप करण्यात येतात. या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी लाभार्थी २२६०० रूपये बॅकेत भरून घेतलेले आहेत.लाभार्थांनी उसने पैसे घेऊन व कर्ज काढून ही २२६०० रूपये रक्कम बॅकेत जेमतेम भरली आहे.परंतू १ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही सदर योजनेचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांस मिळालेला नाही.त्यामुळे लाभार्थी हे कर्ज घेतलेले पैशाचे व्याज भरत आहेत. दूधाळ जनावरांचा लाभ न मिळाल्यामुळे आदिवासी लाभार्थांची एक प्रकारे मोठी फसवणूक झालेली आहे.काही लोकप्रतिनिधींनी व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडून त्यांच्या स्वतःच्या घरात फाॅर्म भरवून घेऊन अधिक पैसे घेतले व मोती बॅकेत योजनेचा लाभ लगेच मिळणार आहे,म्हणून फसवणूक पैसे भरून घेतले व नंतर हात वर केले आहे,त्यामुळे आमची या लोकांनी फसवणूक केली आहे,दूधाळ जनावरे द्यायची नव्हती तर आमच्याकडून पैसे का भरवून घेतले? आमची फसवणूक का केली? असे आदिवासी लाभार्थी म्हणत आहेत. दूधाळ जनावरे वाटपास खूप विलंब झालेला आहे.त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झालेला आहे.म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी लाभार्थ्यांस तात्काळ दूधाळ जनावरे वाटप करण्यात यावेत. हीच नम्र विनंती.अन्यथा आदिवासी लाभार्थ्यांसोबत बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या