चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयित व्यक्तीला चोरीच्या उद्देशाने आडोशाला बसलेला आढळून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोकों अंकुश एकनाथ जाधव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या रात्रगस्त दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
फिर्यादी पोलीस कर्मचारी अंकुश जाधव यांनी दिलेल्या अहवालानुसार, दि. 03/06/2025 रोजी सकाळी 01:15 वाजता बस स्टँड चौकाजवळील गोंविद बिअर बार परमिट रूमच्या शेजारी एक अज्ञात इसम आंधारात चेहरा लपवून बसलेला दिसला. संशयितावर संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. त्याने सुरुवातीला आपले नाव आणि गाव सांगण्यास टाळाटाळ केली, मात्र पुढे आपले नाव नारायण मच्छिंद्र लोखंडे, वय २५ वर्ष, रा. झाडबुके मैदान, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर असल्याचे सांगितले.
पोलीसांना संशय आला की तो चोरी करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी बसलेला आहे, कारण तो आडोशाला बसून आपले अस्तित्व लपवत होता आणि त्याच्या उत्तरांमध्ये असमाधानकारकता होती. त्यानुसार पोलीसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १२२ (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0492 अंतर्गत झाली असून पोलीस निरीक्षक बाळाजी अंकुश कुकेडे यांच्याद्वारे तपास सुरू आहे.
बार्शी पोलीस प्रशासनाचा हा वेगवान कारवाईचा पाठिंबा आणि रात्रगस्तातील सतर्कता स्थानिक नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.
0 टिप्पण्या