चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-जिल्ह्यातील विविध ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बदलीचे आदेश जि.पो.प्रमूख सोमय मुंडे यांनी काढले असून,बदली झाली त्यांनी आपापला पदभार घेतल्याचे समजते.
माञ,उदगीर तालुक्यातील वाढवणा ठाण्यात कार्यरत असलेले स.पो.नि. बी.एस.गायकवाड व पो. उपनि.एम. के.गायकवाड यांची नुकतीच उदगीर येथे बदली झाली आहे.तर उदगीर ग्रामिण पो.ठाण्यात असलेले सपोनि.सुनिल.पी. गायकवाड यांची बदली वाढवणा बू.येथे झाली असून,तीनही गायकवाडांनी आपापला पदभार हाती घेतल्याचे समजते.
वाढवण्यातून २ गायकवाड बदलून गेले आणि १ गायकवाड बदलून आले.हा योगायोग म्हणावा का,अजुन कांही.. पण कांही का असेना बदलून गेलेले व आलेले गायकवाड हे कर्तव्यकठोर व दक्ष आहेत. हे खरे.
———————————————
नुतन सपोनि.समोर आव्हानांचा ढीग वाढवणा ठाण्यात नव्याने आलेले सपोनि.एस.पी.गायकवाड हे कडक शिस्तीचे असल्याचे तसेच ते उदगीर मध्ये असताना तेथील वाहन धारकांना शिस्त लावल्याचे प्रसंगी कायद्याची *सुंदरी*हाणल्याचे तसेच आव्हानांचा सामना करणे त्यांना खुप आवडते.असे येथे व उदगीरात बोलले जाते.तेंव्हा वाढवणा ठाण्यात असलेल्या हंडरगुळी बीट मधील आव्हानांचा ते कसा सामना करतात. याकडे हाळी-हंडरगुळीकरांचे लक्ष लागले आहे.
———————————————
अवैध धंदे कमी आणि हाळीत वाहतूकीचा खोळंबाच जास्त
असे चिञ नेहमीच उदगीर- अहमदपुर रोडवर दिसते.आणि या बेशिस्तीत थांबलेल्या गाड्यांमुळे या रोडवर सतत छोटे-मोठे अपघात झाले आहेत.तरीही यावर आजवर कुणीच *कंट्रोल*ठेवले नाही.तसेच कारवाई पण केली नाही. परिणामी बेशिस्तीत पार्क केलेल्या गाड्यांचे कांही चालक,मालक यांचे कांही व्यापारी बांधवांशी अनेकदा *शाब्दिक वाॅर*झाले आहेत.तेंव्हा भविष्यात मोठे वार,वाद होऊ नये म्हणुन ग्रा.पं. प्रशासनाच्या मदतीने *नो पार्किंग व नो हाॅकर्स झोन*तयार करण्याची गरज आहे.प्रसंगी कायद्याचा हबाडा देणे ही गरजेचे आहे.
कारण,पोलीस खात्याचे विविध विभागाचे पथके फिरत असल्याने अवैध धंदे धंडावले असले तरीही राज्यमार्गावरची वाहतूक कोंडी व बेशिस्तीत होणारी वाहनांची पार्किंग अनेकांच्या जिवावर उठली आहे.
व नुतन सपोनि.एस.पी.गायकवाड यांना हे एक मोठे आव्हानच आहे.तेंव्हा ते या प्रश्नी लक्ष कसे व कधी घालणार?
——————————————
टी.कोरके गेले नांदेडला वाढवणा ठाण्यातील अवैध धंदेवाल्यांवर अवघ्या कांही दिवसातच दबदबा निर्माण केलेले दुसरे पोउपनिरिक्षक. टी.कोरके यांची पण नुकतीच बदली झाली असून ते नांदेडला बदलून गेले आहेत.असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या