Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. हिरेमठ हॉस्पिटल’ पुन्हा नव्या दिमाखात सुरु होणार : १५ जून रोजी भव्य उद्घाटन सोहळा

 

– 1990 च्या दशकात सुवर्णकाळ अनुभवलेल्या हॉस्पिटलचे नव्या रूपात पुनरागमन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर– बार्शी शहराच्या वैद्यकीय इतिहासात मानाचं स्थान असलेलं आणि पंचक्रोशीत आपल्या उत्कृष्ट आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध असलेलं डॉ. हिरेमठ हॉस्पिटल आता नव्या आधुनिक स्वरूपात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा सुरू होत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा आरोग्यसेवेचा वारसा, नव्या पिढीच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा बार्शीकरांच्या सेवेत दाखल होतो आहे.

या हॉस्पिटलची स्थापना डॉ. ए. जी. हिरेमठ आणि ॲड. गंगाधर सोपल यांनी केली होती. त्याकाळी डॉ. जी. बी. हिरेमठ, डॉ. बी. एम. नेने आणि डॉ. सुमंगल देशपांडे यांची मोलाची साथ लाभल्याने हे हॉस्पिटल 1990 च्या दशकात बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरात एक महत्त्वाचे आरोग्यकेंद्र ठरले होते. मात्र, काळाच्या ओघात हे हॉस्पिटल काही काळासाठी मागे पडले.

आता वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड (VHPL) या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीच्या माध्यमातून, जुन्या प्रतिष्ठेचा वारसा जपत आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने हे हॉस्पिटल पुन्हा सुरु होत आहे. या कंपनीत डॉ. निनाद माढेकर, डॉ. स्नेहल माढेकर, डॉ. मयुरी पाटील, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. गौरी गायकवाड आणि श्री अमित इंगोले यांचा समावेश असून, इतर अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील मित्रमंडळींनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

या नव्या हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन रविवार, १५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. भालचंद्र कश्यपी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, मा. आमदार दिलीपराव सोपल अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी श्री जयवंत बोधले महाराज आणि श्री राजा माने हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक सुविधा :

प्रशस्त ICU (Intensive Care Unit) आणि CCU (Cardiac Care Unit)

२४ तास कार्यरत आपत्कालीन सेवा (Emergency Department)

अद्ययावत ऑपरेशन थिएटर

स्पेशल रूम्स, जनरल वॉर्ड व सूट

भव्य वेटिंग हॉल व डॉर्मेट्री सुविधा

सर्व विभागांसाठी स्वतंत्र ओपीडी (Outpatient Department)

अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

नवसज्ज लेबर रूम आणि नवजात शिशु कक्ष (NICU)

कॅफेटेरिया आणि गार्डन एरिया

बार्शीकरांच्या सेवेसाठी पुन्हा नव्या जोमाने सुरु होणाऱ्या या हॉस्पिटलमुळे आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणार असून, रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आरोग्यदायी उपक्रमाला प्रतिसाद देत उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या