Ticker

6/recent/ticker-posts

तब्बल सव्वाचार लाख रुपये किंमतीची हातभट्टीची दारू पकडली

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे-अवैद्य गावठी हातभट्टी अड्डयावर छापा मारुन तब्बल सव्वाचार लाख रुपये किंमतीची हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली.
शहरात अवैध धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने काळेपडळ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिग पाटील यांनी तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
वरिष्ठांनी दिलेले आदेशाप्रमाणे दिनांक ११/०६/२०२५ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कंजारभाट वस्ती, संतोषनगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, पुणे येथे बांधकाम चालु असलेल्या बिल्डिग जवळ एक इसम दारुचा साठा करुन लोकांना दारुविक्री करीत आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस स्टाफ यांनी सापळा रचून हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु विक्री करणारा इसम नामे नवीन दिलीप बिनावत, वय ५४ वर्षे, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे यास ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ५३ कॅन व एक बैरल मध्ये भरुन ठेवलेली २०६५ लिटर तयार ४,१३,०००/- रु. किंमतीची हातमट्टीची दारु इ. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२५/२०२५ भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे, परशुराम पिसे यांचे पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या