भ्रष्टाचाराची पुन्हा चौकशी होणार, गटविकास अधिका-यांचे आश्वासन!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा:ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा खोटा व चूकीचा अहवाल दिल्याबाबत व चौकशीबद्धल तक्रार म्हणून माझे समाधान झाले नसल्याची तक्रार तक्रार दार उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार, रामदास मुसळदे,तक्रारदार उपसरपंच दिलीप मुसळदे,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच, ग्रामपंचायत टूकी ता.शहादा यांनी श्री.दामू चांद्या वसावे ग्रामसेवक ग्रामपंचायत टूकी यांनी १५ व्या वित्त आयोग योजनेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी तक्रार दिनांक ५/६/२०२४,दिनांक ७/१०/२०२४ रोजी दिली होती.उपसरपंच ग्रामपंचायत टूकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टूकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत आहेत, भ्रष्टाचार करीत आहेत. ग्रामसेवक यांनी दिनांक ८/११/२०२२ रोजी १५ व्या वित्त आयोगातून डीएससीने बिना काम करता एकुण दोन लाख साठ हजार रूपये (२६००००)काढले आहेत. तसेच ग्रामपंचायत टूकी येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत. उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहे.तरी ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी.अशी मी मागणी केली होती.
ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचाराची श्री.मनोज आर देव विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीबाबत मी समाधानी नाही.चौकशी अधिकारी यांनी कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही,असा चुकीचा व खोटा अहवाल दिला आहे.तरी सदर चौकशी अहवालाबाबत माझी हरकत आहे.सदरचा चौकशी अहवाल मला मान्य नाही.तरी स्वयंस्पष्ट सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी.अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी केली आहे.गटविकास अधिकारी यांनी पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
0 टिप्पण्या