घरगूती बील ८६२० रूपये,यूनीट २० वरून ५२५; कार्यकारी अभियंता यांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : माहे जून २०२५ चे ग्राहकांचे वाढीव वीज बिल रक्कम कमी करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.वीज ग्राहकांचे जून २०२५ चे लाईट बील रक्कम अचानक दुप्पट, तिप्पटीने वाढवण्यात आली आहेत.अशा ग्राहकांच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. वाढलेल्या वीज बील मुळे ग्राहक त्रस्त आहेत. वीज बील भरण्याची ऐपत नसल्यामुळे घराचा वीज पुरवठा विद्युत वितरण कंपनीकडून बंद करण्यात येईल, अशी भिती निर्माण झाली आहे.वाढलेल्या वीज बीलचा फटका सर्व सामान्य, गरीब, आदिवासी जनतेला अधिक बसणार आहे.शेतकरी, व्यापारी यांनाही वाढीव वीज बीलचा शाॅक बसला आहे.
श्रीम.थावलीबाई जहांगीर पावरा ग्राहक क्रमांक ०८६५१०००६७४९ राहणार प्रभूदत्तनगर ता.शहादा जि. नंदुरबार यांचे जून २०२५ चे घरगुती लाईट बील ३०६० रूपये आले आहे. मागील काही महिन्यांचे लाईट बील हे ५०० रूपये,७२१ रूपये अशे होते. तसेच श्री.रमेश गोकुळ चौधरी ग्राहक क्रमांक ०८९००००४३४५२ राहणार फकिरानगर लोणखेडा ता.शहादा जि.नंदुरबार यांचे जून २०२५ चे लाईट बील ८६२० रूपये इतके जास्त आले आहे.एका महिन्यांचे ५२५ युनिट वीज वापर असेही बीलावर दाखवत आहे. मागील काही महिन्यांचे यूनीट फक्त २० होते.वरील लाईट बील हे चुकीचे व अवाजवी आलेले आहे.ग्राहकांची लूटमार करणारे वाटते.म्हणून लाईट बील ची सखोल चौकशी करण्यात यावी.लाईट मीटर चे रिडींग तपासण्यात यावीत. अंदाजे लाईट बील दिले नाहीत ना? याची खात्री करण्यात यावी.सर्व सामान्य गरीब लोकांना वीज वापर नसतांना एकाच महिन्यांचे ऐवढे जास्त लाईट बील भरणे अशक्य आहे.
जून २०२५ महिन्यांचे लाईट बील हे ग्राहकांना दुप्पट व तिप्पटीचे वाढलेले दिसते.अचानक वाढलेल्या या लाईट बील मुळे ग्राहक आश्चर्य चकित आहेत. ग्राहकांची विद्युत वितरण कंपनी फसवणूक करीत आहे,अशी भावना निर्माण होत आहे.म्हणून जून २०२५ च्या लाईट बील मध्ये झालेली अचानक वाढ कमी करावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून वीज वितरण कंपनीस देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या