"आता तरी प्रकाश आंबेडकरांना समजून घ्या.” परिसंवाद मेळावा संपन्न!
चित्रा न्युज प्रतिनिधी
बीड – महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी शांतीदुताची भूमिका पार पाडली. विविध जाती धर्मांच्या समूहांना एकसंध जोडून वंचित,उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला.असे प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर विद्वत्त महासभेचे सल्लागार भास्करजी भोजने यांनी व्यक्त केले. “आता तरी प्रकाश आंबेडकरांना समजून घ्या”या परिसंवाद मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोजने बोलत होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भास्कर भोजने यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक ,राजकीय, भूमिकांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी वंचितच जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी १९८० पासून सक्रिय राजकारणास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रयोग राबवित सत्तेमध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न केला. मात्र काही स्वयंघोषित बुद्धिजीवी विचारवंत यांनी आंबेडकर यांच्या भूमिकांबाबत गैरसमज पसरवत आहेत. असे काही लोक गोपनीय बैठका घेऊन, मोडून-तोडून व ऐकीव कथा रचून, विविध भूमिकेला मोडून-तोडून मांडणी करत असल्याने अपप्रचार झाला, असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय सरवदे यांनी मांडले. यावेळी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडी बीड (प)चे जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या