चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : दिनांक २२ जून २०२५ रोजी शहादा शहरात डफळे वाजवून ५ पेक्षा अधिक लोक जमवून शहादा शहरात सभा घेऊन मनाई आदेशाचे उल्लंघन करणा-या आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी व शिवसेना शिंदेगटाची सभा आयोजित करणा-या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा,अशी मागणी आदिवासी संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,शहादा शहर अध्यक्ष इकबाल शेख,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार, रामदास मुसळदे,भुरेसिंग भील व सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी,नंदूरबार यांनी नंदूरबार जिल्ह्य़ात दिनांक ०९/०६/२०२५ सकाळी ००.०१ वाजेपासून ते दिनांक २३/०६/२०२५ चे २४.०० वाजेपर्यंत जमाव बंदी आदेश लागू केलेला आहे. सदर कालावधीत सार्वजनिक ठिकाणी भाषण करणे,५ पेक्षा अधिक जमाव,सभा यास मनाई करण्यात आली आहे.असे पोलीस निरीक्षक शहादा यांनी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना दिनांक १० जून २०२५ रोजी दिलेल्या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे.तरी दिनांक २२ जून २०२५ रोजी शहादा शहरात आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी व शिवसेना शिंदेगट शहादा चे सभा आयोजक यांनी सार्वजनिक ठिकाणी डफळे वाजवून वाजत गाजत ५ पेक्षा अधिक लोक जमवून रॅली काढली व सभा घेतली,असल्याचा विडीओ सोशल मिडीयावर व न्यूज वरती दिसून येत आहे.
दिनांक २२ जून २०२५ रोजी शहादा शहरात सार्वजनिक ठिकाणी डफळे वाजवणे,रॅली काढणे,सभा घेणे,भाषण करणे इत्यादींस शिवसेना शिंदेगट शहादा सभा आयोजक यांनी परवानगी घेतली होती का? पोलिसांनी परवानगी दिली का? परवानगी नसेल तर पोलीसांनी नोटीस दिली का? पोलिसांनी जमाव बंदी रोखली का? याचा खुलासा व्हावा.दिनांक ११ जून २०२५ रोजी आदिवासी संघटनांनी शहादा शहरात बाईक रॅली काढली म्हणून पोलीस ठाणे शहादा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे दिनांक २२ जून २०२५ रोजी शहादा शहरात ५ पेक्षा अधिक लोक जमवणा-या व सभा घेणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत,अशी मागणी आदिवासी संघटनांनी शहादा पोलीस ठाणे प्रशासनाकडे केली आहे.
0 टिप्पण्या