दबंग पोलीस पाटीलला पदावरून हटवा- आदिवासी संघटना आक्रमक
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-खैरवे-भडगांव येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील यांनी त्यांच्या विरोधातल्या गांवक-यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या कारवाई पासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्याच्या माणसाकडून माझा जबरदस्तीने एका कागदावर अंगठा मारून घेतला आहे,त्या पोलीस पाटील विरूद्ध माझी लेखी तक्रार आहे,अशा स्वरूपाची लेखी तक्रार उपविभागीय अधिकारी शहादा यांना अर्जदार बन्सी रणसिंग भील यांनी दिली आहे. यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,शहादा शहर अध्यक्ष इकबाल शेख,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार, रामदास मुसळदे,भुरेसिंग भील व सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
खैरवे भडगांव या गांवातील पुरूष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून ,सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून, अत्याचार करून गांवाची शांतता,कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणा-या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना,भारतीय स्वाभीमानी संघ, एकलव्य संघटना इत्यादी विविध आदिवासी संघटनांनी प्रांत अधिकारी शहादा यांना निवेदन देऊन केली आहे.
स्वतःला दबंग पोलीस पाटील समजणारा,पोलीस पाटील पदाचा राजीनामा खिशात घेऊन फिरणारा पोलीस पाटील धनराज पानपाटील हा खैरवे भडगांव येथील आदिवासी बांधवांवर गेल्या २ वर्षांपासून अन्याय अत्याचार करीत आहे.आदिवासी महिलेला रात्री २ वाजता घरात घुसून मारहाण करीत आहे.हा अत्याचार आम्ही कदापी सहन करणार नाहीत. पोलीस पाटील कोणत्याही समाजाचा असता तरी आम्ही त्याच्याविरोधात आवाज उठवला असता.दलित व आदिवासी असे राजकारण कुणीही करू नये. याला पदावरून हटविले नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.तुझी दबंग गिरी तुझ्या घरात ठेव,आमच्या वर कुणीही दबाव आणायचा नाय,आम्हाला डिवचण्याचा काम करू नये,आम्ही आमदार असो की कुणी ही असो,जो आदिवासींवर अत्याचार करेल त्याला आम्ही सोडणार नाही,अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली तर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांवर कुणीही दबाव आणू नये,आम्ही दबावाला बळी पडणार नाही,अशी प्रतिक्रिया भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी यांनी दिली आहे.
गावाचा पोलीस पाटील आम्हाला वाईट वाईट शिवीगाळ करून मारझोड करतो, आम्हाला अपमानित करतो, आमच्याशी असभ्य वागतो.गांवाचा शांतता,कायदा व सुव्यवस्था बिघडवतो.आम्हाला पोलीस पाटील चा अत्याचार असह्य झाला आहे.म्हणून त्याला पोलीस पाटील पदावरून हटवा ,अशी प्रतिक्रिया गांवातील महिलांनी दिली आहे.
0 टिप्पण्या