Ticker

एक्स रे टेक्नीशियनने केल्या घरफोड्या…पोलिसांनी जप्त केले ४८ तोळे सोने अर्धा किलो चांदी

चित्रा न्युज प्रतिनिधी 

पुणे-सलग २३ दिवस तपास करुन अंदाजे १७० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक करुन त्याआधारे व तांत्रिक विश्लेषण करुन गोपनिय माहिती काढुन घरफोडी चोरी करणा-या एका एक्स रे टेक्नीशियन ला पकडून त्याच्याकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दिनांक १७/०५/२०२५ रोजी ते दिनांक १८/०५/२०२५ रोजी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, गुन्हा रजि नं ४७७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३) (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार यांना नंबर प्लेट नसलेली एक यामाहा कंपनीची R15 संशयित मोटार सायकल मिळुन आली. सदर मोटार सायकलबाबत संशय आल्याने सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक केले असता सदर सी.सी.टि.व्ही. कॅमे-यामध्ये घरफोडी चोरी करणा-या आरोपीने सदर मोटार सायकलचा वापर केल्याचे समजले त्यानंतर सदर आरोपीचा सोलापुर, बार्शी, धाराशिव, भुम परांडा याठिकाणी शोध घेतला.
त्यानंतर दिनांक ११/०६/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रविण काळुखे व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडील सपोनि सी बी बेरड व पोलीस अंमलदार तसेच घरफोडी/चैन-स्नॅचिंग पथकातील पोलीस अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अंमलदार यांनी सलग २३ दिवस तपास करुन अंदाजे १७० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक करुन त्याआधारे व तांत्रिक विश्लेषण करुन गोपनिय माहिती काढुन आरोपीचा शोध घेत असताना पथकास मिळालेल्या बातमीदारामार्फत सदरचा घरफोडी करणारा संशयित आरोपी यास गोडबोले वस्तीजवळ, मांजरी, पुणे येथे सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता रोहित विलास अंधारे, वय २५ वर्षे, धंदा -एक्स रे टेक्नीशियन, रा. मुळगाव भांडगाव, ता. परांडा, जि. धाराशिव, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे, असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने समांतर तपास करता त्याने मगरपट्टा सिटीतील फ्लॅटमध्ये चोरी करुन नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास करुन नमुद आरोपीकडुन एकुण ४३,५५,०००/- रु किं. चा ४८ तोळे वजनाचे सोन्याचे डायमंडचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी व मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे- १ गणेश इंगळे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, सहा. पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड, व पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीपराठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, गणेश ढगे, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, जहांगिर पठाण, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, गणेश लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश गोसावी, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश खरात, दयानंद तेलंगे, नारायण बनकर, सुरेश जाधव यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या