सन्मान द्या व सन्मान द्या या सामाजिक उपक्रमांतर्गत
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमा अंतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस , दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे विदर्भ विभागीय संपादक, जनता टाईम /जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचचे औचित्य साधून आज दिनांक 17 जून 2025 ला विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला करण्यात आले होते. यात प्रामुख्याने माझी पीएसआय दिलीप वानखडे, सामाजिक कार्यकर्ते अर्पित मेश्राम, तुळशीराम गेडाम, प्रबोधनकार अनिल चचाने, नरेश तिरुपती एम्पोरियम गिफ्ट भंडारा, समर्पण ब्लड बँक भंडारा यांना सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे, रवी डिब्बे, डॉ ओंकार दास बोरकर ,मानसी फडस ,आचल लांजेवार ,वाल्मीक भोंडे ,नितेश थोटे ,प्राची बावनकुळे, पौर्णिमा मेश्राम ,प्राजक्ता तारेकर , सामाजिक कार्यकर्ते रमेश दुपारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. वाढदिवस हे नाममात्र होते परंतु समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या गौरव व्हावा त्यांच्या सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे विशेष.
0 टिप्पण्या