चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाने शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ठ ठरावीक काळात पुर्ण केले. म्हणुन जिल्ह्यातील अनेक सरकारी रुग्णालयाला कायाकल्प हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे शासनाने जाहीर केले या मध्ये लातुर जिल्ह्यातील आणि
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील आरोग्यवर्धिनी {प्रा.आ.} केंद्राला शासनाचा कायाकल्प हा पुरस्कार मिळाला आहे.असे आरोग्य विभागातर्फे घोषित केले आहे.यासह ५० हजार मिळाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
उदगीर तालुक्यातील म्हत्वाचे केंद्र म्हणजे हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आहे.आणि या केंद्रा लगत असलेल्या मोरतळवाडी, वंजरवाडी,चिमाचीवाडी,रुद्रवाडी, वडगाव,शेळगाव,टाकळगाव,सुकणी खरबवाडी,गादेवाडी,वायगाव सह ३०/४० गावातील रुग्ण येथे आरोग्य तपासणीसाठी येतात.आणि येथे यापुर्वी तत्कालिन वै.अ.डाॅ.वामन राठोड यांच्यासारखी सेवा सध्याचे कार्यरत असलेले डाॅ.स्वप्निल एस. काळवणे हे उप्लब्ध अपु-या स्टाफ सह २४x७ बजावताना दिसतात.
अपघात झालेले,विषारी प्राण्यांनी दंश केलेले,विष प्यायलेले,आत्महत्य केलेले,जळालेले रुग्ण येतात.तसेच कुटूंब कल्याण शस्ञक्रिया,डिलिवरी करण्यासाठी पण पेशंट येतात,तसेच दररोज २०० / २२५ ची ओ.पी.डी. असते.तर आठवडी बाजार रविवार या दिवशी दुप्पट ओपीडी असते.तर आयपीडी रोज दोन,चार असतातच. अशा प्रकारे या दवाखाण्यातील वै. अधिका-यावर मोठा ताण असतो. त्यात अपुरा स्टाफ ! असतानाही आहे त्या स्टाफला सोबत घेऊन या परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी २४x७ तास विविध योजनेमधून व आहे त्या सुविधा वापरुन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार मेडिकल आॅफीसर स्वप्निल एस. काळवणे हे सेवा बजावताना दिसत आहे.आणि याचेच फळ म्हणुन या आरोग्यवर्धिनी (प्रा.आ.) केंद्राला शासनाचा कायाकल्प हा पुरस्कार मिळाला आहे.
गरोदर मातांची घरोघरी जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी,तपासणी करणे तसेच राञी-बेराञी आलेल्या व अडलेल्या गरोदर मातेची अत्यंत योग्यरित्या सेवा करणे तसेच केंद्रात येणा-या बहूतांश रुग्णांना जाग्यावर आरोग्य सुविधा पुरविणे असे हे काम ईश्वर सेवा समजून सहका-यांच्या मदतीने करत आहोत.तसेच केंद्रात येणारे बहूतांश रुग्ण हे गरीब,मजुर वर्गातील असतात,म्हणुन अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शासनाच्या आरोग्यविषयक असलेल्या सुविधा यांची माहिती देतो.तसेच ईश्वरांची सेवा समजून रुग्णांची सेवा करतोय.
*डाॅ.एस.एस.काळवणे*
वै.अ.हंडरगुळी.
0 टिप्पण्या