Ticker

6/recent/ticker-posts

इन्हरव्हील क्लब 2025-26 पदग्रहण समारंभाचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहरातील इन्हरव्हील क्लबऑफ भद्रावती या सामाजिक संस्थेची एक सामाजिक कार्य करणारी संस्था म्हणुन शहरात ओळख आहे.
या संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकीची जोपासना केली जाते. 
    इनरव्हील क्लब ऑफ भद्रावतीची  दरवर्षी कार्यकारिणी बदलविण्यात येत असते.नविन नेतृत्वाला वाव देवुन अधिक उत्साहाने सामाजिक कार्य करण्यास प्रेरित केल्या जाते. दरवर्षी पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीचा पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक १५ जुलैला स्वागत सेलिब्रेशन हाॅल भद्रावती येथे सायंकाळी 7.00 वाजता संपन्न होणार आहे. 
 2025 - 26 च्या नविन कार्यकारिणीत : - अध्यक्ष: सौ. मनीषा ढोमणे, सचिव: सौ. तृप्ती हिरादेवे, कोषाध्यक्ष: सौ. रश्मी बिसेन, ISO: सौ. वर्षा धानोरकर, CC: सौ. विभा बेहेरे.
या समाजसेविकांची निवड झाली आहे.
   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर मनीष मूलचंदानी यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. रमा गर्ग, तहसीलदार राजेश भंडारकर, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेरकी, डॉ. मनीष सिंग, अनिल धानोरकर व इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
   सर्व सदस्यांनी वेळेवर ऊपस्थित राहन्याची विनंती इनरव्हील क्लब ऑफ भद्रावती तर्फे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या