चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-महा एनजिओ फेंडरेशन पुणे व ग्राम विकास संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लावेश्र्वर येथील जीवन गौशाळा मध्ये वृक्षलागवड करून गोसेवा हरित सेवा उपक्रम साजरा करण्यात आला.
गोसेवा हरित सेवा मा . श्री देवेद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आणि शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसाचा विशेष उपक्रम चे औचित्य साधून गोसेवा हरित सेवा उपक्रम2025 श्री गौरक्षण संस्था चांदणी चौक भंडारा व श्री साई गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट भंडारा संचालित जीवन गौरक्षण लावेश्वर येथे वृक्षारोपन करून साजरा करण्यात आला . वृक्षलागवड कार्यक्रमाला श्री गौरक्षण संस्था भंडारा चे गोसेवक तिवारी महाराज आणि जीवन गौरक्षण लावेश्वर चे अध्यक्ष विश्वजित कटकवार तसेच
महा एनजिओ फेंडरेशन पुणे चे जिल्हा समन्वयक तथा ग्राम विकास संस्थेचे संस्थापक दिलीप बिसेन , संस्थेच्या संचालिका रुपाली बिसेन , प्राची रहागडाले , गार्गी बिसेन ,स्वरा भगत, दक्ष बिसेन , शिव कटरे त्याचप्रमाणे गौशाळेचे सेवक कर्मचारी उपस्थित होते .
मा.जिल्हा प्रतिनिधी/ वार्ताहर
0 टिप्पण्या