चित्रा न्युज प्रतिनिधी
गोरेगांव:- दिनांक २२ जुलै २०२५ रोज मंगळवारला पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या घोटी येथील आईल मिल मध्ये किसान गोष्टी या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. चित्रकलाताई चौधरी होत्या.
तर यावेळी माननीय कृषी तालुका अधिकारी गोरेगांव राजपुत लालन मॅडम , माननीय बांधकाम सभापती जि.प.गोंदिया लक्ष्मणजी भगत , माननीय सचिव कृ.ऊ.बा.स.गोरेगांव आशिष बघेले , माननीय संचालक/अध्यक्ष पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरेंद्रजी बिसेन , माननीय संचालक /सचिव पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी दुर्गाप्रसादजी ठाकरे ,
माननीय संचालक पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरेशजी राहांगडाले , माननीय संचालक एग्रोटेक कंपनी साहेबलालजी कटरे , माननीय संचालक पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी
गोविंदजी भैरम , माननीय संचालक पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी धृवराजजी टेंभरे , माननीय प्रोड्युसर ओमचंदजी पटले , माननीय संचालिका ए.पी.एम.सी.
शशीताई पुंडे , माननीय व्यवस्थापक आत्मा गजाननजी पटले ,
माननीय जिल्हा व्यवस्थापक ए.टी.सी.संजय ठाकरे , माननीय सर्व कृषी सहाय्यक अधिकारी उपस्थित होते.
तसेच विविध गावांतील शेतकरी , महिला शेतकरी व स्थानिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे उद्दीष्ट शेतकऱ्यांना नव्या कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचे उपाय,मृदाआरोग्य तपासणी व सल्ला,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,पिकबिमा योजना,नैसर्गिकखतांचा प्रभावी वापर,कीड व रोग नियंत्रण तंत्र,पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन,ईत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
शासकीय योजनांची व सेंद्रिय शेतीच्या महत्वाची माहिती देणे.
जैवीक शेती करणारे प्रगतीशील शेतकरी मा.माजी उपसभापती सुरेंद्रजी बिसेन,मनिरामजी पटले,रामलालजी पटले,अशोक काठेवार,शशीताई पुंडे,संचालक दुर्गाप्रसादजी ठाकरे व माणिकचंदजी मेळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकरी बांधवांनी कार्यक्रमात उत्तम प्रतिसाद दिला आणी अनेकांच्या शंकांचं निराकरण कृषी तंज्ञांनी केले.
शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणी शेतीशी संबधीत ज्ञान मिळविण्याच्या उद्देश्याने किसान गोष्टी
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आत्मा व्यवस्थापक माननीय गजानन पटले यांनी केले.
तर कार्यक्रमाचे समारोप सत्र शेतकऱ्यांचा अनुभव व चर्चा सत्राने संपन्न झाले.
0 टिप्पण्या