सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- दि. २५/७/२०२५ रोजी आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहे की, मंगळवार दि. २९/७/२०२५ रोजी नागेश्वर यात्रा आहे. यात्रा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन पुर्णपणे सज्ज आहे.
सर्व नागरिकांना आवाहन आहे की, योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे गाड्या लावू नये तसेच गुंड प्रवृत्तीच्या तत्वांकडून यात्रेला गालबोट लावले जाऊ नये.जर आढळून आले तर पोलीस प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच यात्रेत योग्य ती काळजी घेण्यात येईल कोणत्याही नागरिकाला किंवा महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने साध्या गणवेशात पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात येईल कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी यात्रेतल्या प्रत्येक गोष्टींवर जामखेड पोलिसांची विशेष नजर असणार आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून जामखेड पोलिसांची यात्रेवर बारकाईने नजर असणार आहे. याशिवाय पोलिस मित्र गर्दीच्या ठिकाणी गस्त घालताना दिसणार आहेत. ज्या भागात नर्तिकांचे डाव असणार आहेत त्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे वॉच ठेवणार आहेत.
तसेच ज्या ठिकाणी आनंद मेळावा भरणार आहे तो संपूर्ण परिसर CCTV च्या निगराणी खाली असणार आहे.यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका यात्रेसाठी नियाजन केले जाणार आहे .
0 टिप्पण्या