Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
 
विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड :-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 25 जुलै 2025 रोजी दुपारी 12:19 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 25 व 26 जुलै 2025 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 25 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच दि. 25 व 26,जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या