Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-टिळक विद्यालय खंडाळा तालुका साकोली येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
        नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत कापगते सर,धनंजय तुमसरे सर,भागवत बडवाईक सर, ए.पि.काशिवार सर, सौं.एम.यु.मेश्राम मॅडम इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
       मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
        विद्यालयातील  शिक्षक धनंजय तुमसरे विद्यार्थ्यांना संबोधित  करताना म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थी घडवणारा गुरु आणि वास्तविक जीवनातील अनुभव देणारा गुरु यांचे सुंदर विश्लेषण करून अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा, व्यक्तिमत्व विकासात सु-असा बदल घडवून आणणारा गुरुच असतो असे मौलिक विचार व्यक्त केले.
        तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, वैदिक काळापासून चालत आलेली गुरुशिष्य परंपरा असून गुरुजनांच्या ज्ञानामुळे आणि मार्गदर्शनामुळेच आपल्या जीवनामध्ये योग्य बदल घडवून आणून गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे मार्मिक विचार व्यक्त केले.
         याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी गुरुजनांवर आधारित भाषणे, गीत सादर करून गुरुजनांचा गुणगौरव केला. 
         कार्यक्रमाचे संचालन आर.जे.करंजेकर सर यांनी तर आभार प्रदर्शन कु. एम. डि. मेश्राम यांनी केले. सरते शेवटी मिठाई व प्रसादाचे वाटप करून वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले.
         कार्यक्रम यशस्वीतेकरिता विद्यालयातील पी. एस. मुंगुलमारे, एस.एम.मेंढे इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या