चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-वनपट्टे धारकांना फाॅर्मर आयडी मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्य़ातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा मिळणे अत्यावश्यक आहे.कारण सातबाराशिवाय पिक विमा योजना,ई पिक नोंदणी योजना इत्यादीची योजनांचा लाभ घेता येत नाहीत. जिल्ह्य़ातील ब-याच वनपट्टा धारक शेतक-यांचे फार्मर आयडी तयार झाले नाहीत. नवीन नियमानुसार महा डिबीटी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना भेटतात त्या आता फार्मर आयडी शिवाय भेटणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे .तसेच ते लागू सुद्धा झाले आहेत. फार्मर आयडी नेच आता महा डिलीटी च्या पोर्टल वर लॉगिन होत आहे . म्हणून जिल्ह्य़ातील वनपट्टाधारक शेतकरी या योजने पासून तसेच पिक विमा, ई पिक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत. म्हणून जिल्ह्य़ातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळावेत व फाॅर्मर आयडी बनवून मिळावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली होती.
विकासचंद्र रस्तागी कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिनांक २ जुलै २०२५ रोजी राज्यातील वनहक्क धारकांना ॲग्रोस्टॅग अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील २.००,७६७ वनपट्टेधारक शेतक-यांना फाॅर्मर आयटी बनवून मिळणार आहेत. त्यासाठी वनपट्टेधारक शेतक-यांचे आधारलिंक मोबाईल क्रमाकांसह वन मित्र पोर्टल वर लिंक करण्यात यावे.अशा सूचना दिल्या आहेत. बिरसा फायटर्सच्या मागणीला यश आल्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी बिरसा फायटर्सचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या